जामखेड तालुका हादरला! मुलगी पळवल्याच्या रागात चाकूने खुन
- Police warrant
- Feb 13
- 1 min read

(ता. जामखेड, ) दि. १३ फेब्रुवारी २०२६:
खुनाच्या भयानक घटनेने जामखेड तालुका हादरला! मजूर तुकाराम सुर्यभान काळे (वय ५०, रा. फक्राबाद) यांची चाकू व काठीने मारहाण करून हत्या करण्यात आली.याप्रकरणी जामखेड पोलीसांनी वैभव एकनाथ काळे याला अटक केली असून, इतर दोन आरोपी फरार आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. १२/०२/२०२६ रोजी आरोपी सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे व तुळसाबाई एकनाथ काळे (सर्व रा. फक्राबाद) हे पीडित कुटुंबाच्या घरी आले. "कमल बाळू पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेली, तिच्या आईला का सांगितलं?" असा संताप व्यक्त करून शिवीगाळ करत "तुम्हाला सोडणार नाही" अशी धमकी दिली. वाद मिटल्याने तक्रार देण्यात आली नव्हती.
फिर्यादी राहुल तुकाराम काळे (वय २५, मजूर, रा. फक्राबाद) यांच्या सांगण्याप्रमाणे, सकाळी १०.३० वाजता बबन लोंढे याने कळवले, "तुझे वडीलांना झोपडपट्टीत मारतायत!" राहुल व भाऊ दिगांबर धावले तेव्हा सागर चाकूने, वैभव चाकूने व तुळसाबाई काठीने तुकाराम यांना मारहाण करत होते. त्यांना पाहताच आरोपी गाडीतून फरार झाले, तुकाराम यांना डोक्यात व खांद्यावर गंभीर जखम, रक्तबंबाळ व बेशुद्ध केले, खाजगी अॅम्बुलन्सने जामखेड सरकारी रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वी मृत घोषित करण्यात आले .पीडित कुटुंबात राहुल, मुले सोन्या-मोन्या-सोनाली, आई कल्पना, भाऊ दिगांबर-सुनील, वहीनी पुनम-रेश्मा असं एकत्र कुटुंब आहे.
सदर प्रकरणाबाबत गुन्हा क्र. ८१/२६ - कलम १०३(१), ३५२, ३५१ सदर गुन्ह्या अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, वैभव एकनाथ यास काळे अटक करण्यात आली आहे. तपास पी.आय. दशरथ चौधरी करत असून सदर घटनेमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.











Comments