जामखेड नगरपरिषदेत नव्या नेतृत्वाचा सन्मानजनक पदग्रहण सोहळा;सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप
- Police warrant
- Jan 1
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/1जानेवारी2026
जनतेच्या विश्वासाला उत्तर देणाऱ्या जबाबदार, पारदर्शक आणि विकासकेंद्रित प्रशासनाची प्रतिज्ञा घेत जामखेड नगरपरिषदेच्या नव-नियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी व नवनिर्वाचित नगरसेवकांचा अधिकृत पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमात सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई चिंतामणी व मा. अमित चिंतामणी यांच्या पुढाकाराने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले

या हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी मुक्त कंठाने कौतुक केले. तसेच, तात्याराम पोकळे यांची गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जोरदार अभिनंदन करण्यात आले.प्रसंगी तहसीलदार श्री. धनंजय बांगर, मुख्याधिकारी श्री. अजय साळवे, मा. प्रा. मधुकर (आबा) राळेभात, मा. शरद कार्ले (सभापती), मा. अमित चिंतामणी यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. हा सोहळा विकासाच्या नव्या दिशेने पाऊल टाकणारा ठरला.











Comments