जामखेड पंचायत समिती पार्किंगमधून TVS स्टार सिटी मोटारसायकल चोरी
- Police warrant
- Feb 1
- 1 min read

जामखेड, १ फेब्रुवारी:2026
जामखेड तालुक्यातील पंचायत समिती परिसरातून TVS स्टार सिटी कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी महादेव कात्रजकर (४४, रा. कुसडगाव) यांच्या मालमत्तेची किंमत २५,००० रुपये असून, नंबर MH १६ CR ९८३२ आहे . गुन्हा क्रमांक ५५/२०२६ अंतर्गत कलम ३७९ नुसार दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी घडली, जेव्हा फिर्यादी कामानिमित्त पंचायत समितीला आले होते. पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली असल्याचे सांगितले असून गुन्हा दाखल दि. २० जानेवारी रोजी दुपारी नोंदवला गेला.
पुढील तपास जामखेड पोलिस करीत आहेत.











Comments