जामखेड बसस्थानकावर दुपारी चोरट्याने लंपास केले ४० हजारांचे सोन्याचे दागिने
- Police warrant
- Feb 4
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी : 4 फेब्रुवारी2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील बसस्थानकावर दुपारी घडलेल्या चोरीप्रकरणी सिंधु अशोक पाचारणे (वय ५३ वर्षे, व्यवसाय - मिरची व्यापारी, रा. कडा, ता. आष्टीनगर, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.२५ ते १.५० या वेळेत जामखेड बसस्थानक, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे त्यांचे पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले.
सोन्याचे दागिने : एकूण किंमत ४०,००० रुपये. गुन्हा क्रमांक ६२/२०२६, कलम ३०३(२) (चोरी) अंतर्गत ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ८.२५ वाजता जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादी सिंधु पाचारणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बस प्रवासादरम्यान लबाडीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय आर्थिक फायद्यासाठी दागिने चोरून नेले.
पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत











Comments