जामखेड : रत्नापुर शिवारातून ६० हजारांचा पाणबुडी पंप चोरीला गेला!
- Police warrant
- Feb 20
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/20फेब्रुवारी2026
रत्नापूर शिवारातून ६० हजारांचा पाणबुडी पंप चोरीला गेला जामखेड तालुक्यातील रत्नापूर गावच्या शिवारातील शेत गट क्र. ५२० मधून अज्ञात चोरट्याने ७.५ एचपी विद्युत पाणबुडी पंप चोरून नेल्याची घटना घडली. फिर्यादी किशोर महादेव बोराटे (वय ४७, रा. खर्डा रोड कॉर्नर, जामखेड) यांच्या शेतातील हा पंप दि.१७ फेब्रुवारी २०२६ रात्री ८ वाजल्यापासून १८ फेब्रुवारी सकाळी ९ पर्यंत चोरीला गेल्याची घटना जामखेड हद्दीत घडली आहे.
एकूण किंमत ६०,७६० रुपये असलेल्या या मालाची चोरी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
जामखेड पोलीस स्टेशनला दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी किशोर बोराटे यांनी फिर्याद दिली. गुन्हा क्र. ९१/२०२६ अंतर्गत बीएनएस २०२३ कलम ३०५(बी) प्रमाणे नोंद घेण्यात आली असून पो.ना. जितेंद्र सरोदे पुढील तपास करीत आहेत.











Comments