जामखेड: हॉटेल न्यु कावेरीसमोर फायरिंग गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने २ दिवसांत ३ आरोपींना गावठी कट्ट्यासह पकडले!
- Police warrant
- 20 hours ago
- 1 min read

जामखेड: २०डिसेंबर२०२५
जामखेड बिड रोडवरील हॉटेल न्यु कावेरी हॉटेल समोर १८ डिसेंबर रोजी झालेल्या फायरिंग प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने तीन आरोपींना गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. फिर्यादी रोहित अनिल पवार यांना जीवघेणे हल्ले झाले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त दोन दिवसांत हे यश मिळवण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की दि.१८ डिसेंबरला रोहित पवार हे त्यांच्या हॉटेलवर असताना आरोपींनी गावठी कट्ट्याने फायर केला. यात रोहित यांना दुखापत झाली. जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १८९(२), १९१(२), १९०, ३२४(५), ३५१(२)(३) व शस्त्र कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली व आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.आरोपींचा शोध आणि अटक
पीआय कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने (पोउपनि अनंत सालगुडे, अतुल लोटके, शामसुंदर जाधव, बाळासाहेब गुंजाळ, मनोज साखरे, सागर ससाणे, योगेश कर्डीले, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर) वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.१८ डिसेंबरला आष्टीतील हॉटेल साईराजसमोर उल्हास उर्फ वस्ताद विलास माने (४९, तपनेश्वर गल्ली, जामखेड) ताब्यात.१९ डिसेंबरला वाळुंज शिवारातील हॉटेल शाम परिसरात शुभम शहाराम लोखंडे (२६, आष्टी) व बालाजी शिवाजी साप्ते (२७, आष्टी) ताब्यात.ताब्यातील आरोपींकडून ३०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा व २०,००० रुपयांचा फिर्यादीचा सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त. एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.पुढील कारवाई
आरोपींना जामखेड पोलीस ठाण्यात हजर करून तपास सुरू. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.











Comments