window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

जामखेडमध्ये Apollo मॅकवेलसह टायरांची लूट! गुन्हा दाखल



जामखेड, 18जानेवारी :2026

जामखेड पोलीस ठाण्यात २४/२०२५ क्रमांकाची फिर्याद नोंदवली असून, बीएनएस २०२३ कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. जामखेड येथील गणेश टिंबर अॅण्ड प्लायवुडच्या समोरच्या मोकळ्या जागेतून १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता १२० चारचाकी गाड्यांचे Apollo कंपनीचे मॅकवेलसह टायर (अंदाजे ११,००० रुपयांचे) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना जामखेडमध्ये घडली आहे.


फिर्यादी संजय गजेंद्र अंधारे (वय ४२, रा. मिलिंदनगर, जामखेड) हे माजी सैनिक असून, त्यांनी १७ जानेवारी रोजी दुपारी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. चोरट्याने लबाडीचा इरादा करून स्वतःचा फायदा करण्यासाठी हा गुन्हा केल्याचा संशय आहे.


जामखेड पोलिसांनी तक्रारीनंतर तात्काळ दखल घेतली असून, प्रभारी अधिकारी पोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सफो/कदम तपास करीत आहेत.

नागरिकांनी रात्री मालाची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.