window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

जामखेडमध्ये ऊस ट्रॉलीखाली तरुणाचा दुर्दैवी मृत्यू: ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टरची मागणी तीव्र



जामखेड प्रतिनिधी/2फेब्रुवारी2026


जामखेड येथील कर्जत रोडवर ऊसाच्या डबल ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडलेल्या अविनाश विक्रम आढाव (वय ३०, रा. धानोरा, ता. जामखेड) यांचा अखेर मृत्यू झाला. ३१ जानेवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मोटरसायकलवरून येत असताना रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर ट्रॉली दिसली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. तरुण १०० फूट फरपटला गेला आणि त्याचा पाय चेंदा रंदा होऊन दवाखान्यात मृत्यू झाला.


संदीप सांगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना सूचित केले असता, दीपक भोरे व ऋषीकेश शेळके यांनी रुग्णवाहिका पाठवली.जामखेड तालुक्यात ऊस वाहतुकीमुळे ट्रॅक्टर ट्रॉलींवर रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प नसल्याने अनेक अपघात होत आहेत. यावरून संजय कोठारी यांनी ट्रॅक्टर चालकांना सक्तीने रिफ्लेक्टर लावण्याची मागणी करून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्याशी संपर्क साधला. प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.