window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

जामखेडमध्ये कोल्हेवाडी शिवारात चोरट्यांचा डल्ला! ७.५ एचपी पाणपंप, स्ट्राटर व केबल चोरी



जामखेड : 4जानेवारी2025

जामखेड येथील कोल्हेवाडी शिवारात शेत गट क्र. ७४ मधील विहिरीवरून अज्ञात चोरट्याने २५,००० रुपयांचा विद्युत पंप व साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली. फिर्यादी बापू विश्वनाथ कोल्हे (वय ४५, रा. कोल्हेवाडी, ता. जामखेड) यांच्या शेतातील हा प्रकार १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ५.३० घडला असून ते ३ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बापू विश्वनाथ कोल्हे यांच्या , शेतातील विहिरीवर ७.५ एचपीचा सीआयआर आय कंपनीचा पाणपुडी विद्युत पंप, स्ट्राटर, केबल व रस्सी असे साहित्य चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरुन नेले. या चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गुन्हा बीएनएस २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात झालेल्या या चोरीप्रकरणाने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.


पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनवणे करीत आहेत


 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.