जामखेडमध्ये गोळीबारानंतर बील वाद थरार! न्यु कावेरी हॉटेलवर नऊ जणांनी चालकाला कोयता-दांडक्याने केले जखमी; तोडफोड
- Police warrant
- Dec 23, 2025
- 1 min read

जामखेड: २२ डिसेंबर२०२५
काही दिवसांपूर्वी जामखेडमध्ये गोळीबाराने दहशत पसरवणाऱ्या हॉटेल न्यु कावेरीवर आता बील वादात नऊ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. हॉटेल चालक सिद्धेश पवार याला कोयता व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले, तसेच हॉटेलची मोठी तोडफोड केली. जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल असून, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रवीण इंगळे तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच हॉटेलवर गोळीबारात सिद्धेश यांचा भाऊ रोहित अनिल पवार गंभीर जखमी झाला होता. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सिद्धेश यांचा भाऊ मोहित पवार याचा आरोपी ऋषिकेश विटकर यांच्याशी बील वाद झाला. रात्री ९ वाजता ऋषिकेश अजिनाथ विटकर, रवी भगवान पवार, राहुल साळुंखे, चेतन साळुंखे (सर्व भुतवडा, जामखेड), शुभम साळुंखे (गोडाऊन गल्ली, जामखेड) व इतर चार अनोळखी जण हॉटेलवर धावले.
बील वाद सुरू झाल्यावर टोळक्याने हॉटेलच्या काचा फोडल्या, खुर्च्या तोडल्या. सिद्धेश यांनी अडवले असता रवी भगवान पवारने लोखंडी कोयतेने डोक्यात मारले, इतरांनी दांडक्यांनी मारहाण केली. सिद्धेश यांच्या डोक्याला ८ टाके, मनगटाला ६ टाके पडले. त्यांच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या सलग घटनांमुळे जामखेड शहरात गुंडगिरीची भीती पसरली असून, पोलिसांना तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.











Comments