जामखेडमध्ये ड्रग्सविरोधी छापा:२.२३ लाखांचा एम.डी. साठा जप्त!वैशाली वूडसमोर धरले ड्रग्स पेडलर
- Police warrant
- Feb 15
- 1 min read

जामखेड प्रतिनिधि/15 फेब्रुवारी2026
जामखेड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या संयुक्त मोहिमेत मंगेश हिरामन पवार या विक्रीसाठी अंमली पदार्थ घेऊन येणाऱ्या आरोपीस पकडले.
त्याच्याकडून ६.१७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि मोटारसायकलसह २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे नोडल अधिकारी पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी पो.उपनि. समीर अभंग, हृदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गावढे यांचे पथक नेमले. हे पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली.
गुप्त माहितीनुसार, मंगेश हिरामन पवार (वय ३०, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) काळ्या मोटारसायकलवर जामखेड-कर्जत रोडवरील वैशाली वूड फर्निचर दुकानासमोर विक्रीसाठी एम.डी. घेऊन येणार होता.
कबाडी यांनी जामखेड पो.नि. दशरथ चौधरींना लेखी रिपोर्ट दिला. चौधरी, देविदास पळसे, एम.टी. मिसाळ यांनी सरकारी-खासगी वाहनाने सापळा रचला. मोटारसायकल दिसताच थांबवून ओळखपत्र दाखवले, नाव-पत्ता घेतला. पॅन्टच्या मागील खिशातून प्लास्टिक पिशवीत एम.डी. सापडला, जो करमाळा (सोलापूर) येथील मकसुद बागवानकडून आणला असल्याचे कबूल केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ हृदय गौतम घोडके यांच्या फिर्यादीवर जामखेड पोलीस स्टेशनात गु.र. ८३/२०२६ दाखल करण्यात आले आहे. गुंगीकारक औषधद्रव्ये कायदा १९८५ च्या कलम ८(क), २१(ब) अंतर्गत.
पुढील तपास चौधरी यांच्याकडून सुरू असून सदर करावाई पो.अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही घटना जामखेड तालुक्यातील ड्रग्सविरोधी लढ्याला बळकटी देणारी आहे











Comments