window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

जामखेडमध्ये बाप-लेकाचा एकाच वेळी गळफास; शहरात खळबळ


जामखेड प्रतिनिधी - 3 जानेवारी2026


जामखेड शहरातील न्यायालयाच्या लगत असलेल्या शेतात बाप-लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.नगरसेवक महेश निमोनकर व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी घटनेची माहिती दिली. व तत्काळ आपल्या रुग्णवाहिका व आणखी एका आरोग्यवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश उमासे यांनी तपासणी करून कानिफ ज्ञानदेव पवार (४५) व सचित कानिफ पवार (१६) हे मृत घोषित केले.


घटनास्थळी नगरसेवक संतोष गव्हाळे व महेश निमोनकर यांनी धाव घेतली. सहाय्यक पीआय शिवाजी कदम व कॉन्स्टेबल सचिन देवडे हेही दाखल झाले. कोठारी यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असून, मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले.


पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस तपास करीत आहेत. एकाच वेळी झालेल्या दुहेरी आत्महत्येने शहर हादरले असून, जामखेडमध्ये चर्चेला उधाण आले आहे, कारणाचा तपास सुरू आहे.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.