जामखेडमध्ये बीडरोडवर रात्रीची चोरी: दुकानाबाहेरील स्कूटी लंपास
- Police warrant
- Feb 11
- 1 min read
Updated: Feb 11

जामखेड, दि. ११ फेब्रुवारी २०२६:
बीडरोडवरील हर्ष मशिनरी दुकानाबाहेर पार्क केलेली १५,००० रुपयांची पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा स्कूटी चोरून नेण्याची घटना घडली आहे . जामखेड पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रविण कचरदास वाफना (वय ४५ वर्षे, धंदा: हर्ष मशिनरी दुकान मालक, रा. हर्ष मशिनरी दुकान, बीडरोड, ता. जामखेड, यांच्या माहितीनुसार, चोरी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता ते ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० वाजेपर्यंत घडली असून दुकानाबाहेर पार्क केलेली अॅक्टिव्हा कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कूटी (मोटारसायकल क्रमांक: MH १६ AX) 3533 चोरट्याने आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली आहे .सदर गुन्हा दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी जामखेड पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आला आहे. बीएनएस २०२३ कलम ३०५(b) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादीने दिलेल्या हकिकतीनुसार, "कुणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी स्कूटी चोरून नेली असून पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत.











Comments