जामखेडमध्ये सदाफुले वस्तीत २० जनावरांची कत्तली रोखली; पोलीस सतर्क
- Police warrant
- Dec 26, 2025
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी 26 डिसेंबर 2025
जामखेड परिसरात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी आणि अवैध कत्तलखाने याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. जामखेड, खर्डा, खडकत भागात असे प्रकार घडत असल्याची माहिती आहे. आज गुप्त सूत्राच्या आधारावर जामखेड पोलिसांनी सदाफुले वस्तीत छापा टाकून २० गोवंशीय जनावरांची सुटका केली. ही जनावरे उपासपोटी कंपाऊंडमध्ये बांधून ठेवलेली होती. तसेच, एक टन हाडे, मांस आणि शिंगे जप्त केली.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सदाफुले वस्तीत कत्तलीसाठी २० गोवंशीय जनावरे (गायी-बैलांसह) उपासपोटी बांधलेली होती. कारवाईत जवळच कत्तल केलेल्या जनावरांचे अवशेष आढळले. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक गावडे, पो.कॉ. ज्ञानेश्वर बेल्हेकर, दीपक बोराटे, आकाश शेवाळे, योगेश दळवी, गणेश काळाने, पो.नाईक सरोदे यांनी कारवाई केली. पंचनामा करून जनावरांना साकत येथील श्री साकेश्वर गोशाळेत सोडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.











Comments