window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

जामखेडमध्ये १ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जंगी जाहीर सभा;सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचा ताकदीनिशी शक्तिप्रदर्शन मेळावा



जामखेड प्रतिनिधी/29 नोव्हेंबर2025

आगामी जामखेड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अहिल्यानगरातील भाजपच्या प्रचाराला बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा जामखेडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सोमवार, दि. १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. मराठी शाळेच्या पाठीमागील भक्तीशक्ती मैदानावर पार पडणार असून, सभेसाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र व विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीचाच झेंडा नगरपरिषदेवर फडकणार असल्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्यानुसार संघटनात्मक बैठका, प्रचारयोजना आणि उमेदवारांशी संवाद अशा उपाययोजना वेगाने राबवल्या जात आहेत.


या प्रयत्नांना बळ देण्यासाठी ‘मुलुखमैदानी तोफ’ मानले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जंगी सभेतून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणार असून, नगरपरिषदेसाठी भाजपचा विकासदृष्ट्या स्पष्ट रोडमॅप मांडणार आहेत.सभेला विविध पक्षनिष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवा वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज स्थानिक भाजपकडून व्यक्त केला जात आहे. जामखेड नगरपालिका निवडणुकीत शहर विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, औद्योगिक संधी आणि रोजगार निर्मिती यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर ठोस उपाययोजना व आगामी राजकीय दिशेबाबत देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांत आहे.

राज्य नेतृत्वाची सभा थेट जामखेडमध्ये होणार असल्यामुळे स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, शहरात सभेबाबतची चर्चा आणि उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या तयारीला वेग आला असून, सर्व समित्या, विविध आघाड्या आणि कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी नियोजन, प्रचार, वाहतूक व शिस्तबद्ध व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत.जामखेडकरांसाठी ही सभा आगामी विकासाचा दिशादर्शक कार्यक्रम ठरणार असल्याची भावना व्यक्त होत असून, नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला निर्णयक गती मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.