ट्रॅक्टर चालवत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; सभापती प्रा. राम शिंदेंचा दौरा
- Police warrant
- Oct 25
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी / १ ऑक्टोबर २०२५कर्जत-जामखेड तालुक्यातील अनेक गावांवर आलेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतं पाण्याखाली गेल्याने उभे पीक वाहून गेले, घरे पडली, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले, तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.या संकटग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे स्वतः ट्रॅक्टर चालवत पुरग्रस्त गावांमध्ये पोहोचले. वाहनाने पोहचता न येणाऱ्या ठिकाणी त्यांनी थेट ट्रॅक्टरने दौरा करत शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्यानंतर प्रा. शिंदे म्हणाले, "इतक्या प्रमाणात पावसाचा तडाखा याआधी कधी झाला नव्हता. यामुळे शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन पातळीवर प्रत्येक बाधिताला मदत मिळावी यासाठी मी वैयक्तिक लक्ष देईन."यावेळी त्यांनी प्रशासनाला काटेकोर पंचनामे करून नुकसानग्रस्तांचा अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले. बाधित कुणीही मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.प्रा. शिंदेंच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असून, शासनाकडून त्वरित मदत व पुनर्वसनाच्या निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











Comments