ध्रुवी धिरज उदमलेने पटकावला जिल्हा प्रथम; हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात यश; पांढरेवाडी शाळेचे नाव उजळले
- Police warrant
- Feb 1
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी : 1 फेब्रुवारी2026
अहिल्यानगर येथे ३१ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत हस्ताक्षर (लेखन) प्रकारात किलबिल गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरेवाडी, ता. जामखेड येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ध्रुवी धिरज उदमले हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाने शाळा व परिसरात उत्साहाची लहर उसळली आहे.ध्रुवीचे वडील धीरज अशोकराव उदमले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडवाडी येथे, तर आई भामिनी धीरज उदमले ह्या जगदाळेवस्ती येथे कार्यरत शिक्षक आहेत.
शाळेतील मार्गदर्शक श्रीमती तेजस्विनी मासाळकर, संतोष घोलप, प्रमोद जोशी, ज्ञानेश्वर सपकाळ व रूपेश वाणी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले, असे शाळ प्रशासनाने सांगितले.यावेळी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक आंधळे व केंद्रप्रमुख केशवतात्या गायकवाड यांनी ध्रुवीचे अभिनंदन केले. पंचक्रोशीतून, तालुक्यातून व जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.











Comments