window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

निवडणूक काळात अवैध हत्यारांचा तपास;जामखेडमध्ये धारदार शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या युवकाची स्थानिक गुन्हे शाखेने केली धडक कारवाईने पकड


जामखेड प्रतिनिधी/24 नोव्हेंबर2025


अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जामखेड शहरात धारदार शस्त्रे बाळगून फिरणार्‍या एका तरुणाला पहाटेच्या कारवाईत ताब्यात घेतले. आगामी नगरपरिषद/नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध हत्यारे व संशयित गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात निवडणूक काळात अवैध हत्यारे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी एलसीबीच्या पथकाला आवश्यक सूचना देऊन विशेष गस्त आणि सापळा कारवाईचे नियोजन केले.


पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई दिपक मेढे आणि पोलीस अंमलदार हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, शाहिद शेख, गणेश धोत्रे, दिपक घाटकर, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब नागरगोजे यांचे पथक 24 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एक इसम जामखेड–बीड रोडने मोटारसायकलवरून जात असून त्याच्या ताब्यात वेगवेगळी धारदार लोखंडी हत्यारे आहेत.


माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने जामखेड शहरातील हॉटेल रघुनंदनसमोर रस्त्यावर सापळा रचला आणि संशयित मोटारसायकलस्वाराची वाट पाहू लागले. काही वेळातच वर्णनासारखा एक इसम मोटारसायकलवरून येताना दिसताच पथकाने त्याला थांबवून स्वतःची पोलीस म्हणून ओळख करून दिली आणि त्याची चौकशी सुरू केली.

चौकशीत त्या इसमाने आपले नाव कैयब शकील पठाण (वय 18 वर्षे, रा. मिलींदनगर, जामखेड, ता. जामखेड) असे सांगितले. दोन पंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या झडतीत त्याच्या ताब्यातून दोन लोखंडी कोयते, एक कुऱ्हाड, एक सुरा, एक चाकू आणि संबंधित मोटारसायकल असा एकूण अंदाजे 32,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या शस्त्रांसह निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपी शहरात फिरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, तो कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणत्या हेतूने परिसरात फिरत होता याबाबत चौकशी सुरू आहे. जप्त शस्त्रांची प्रकारवार व कायदेशीर तपासणीही केली जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सूचित केले.

या प्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर अंकुश जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 629/2025 असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनद्वारे करण्यात येत असून, आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड, संभाव्य साथीदार आणि शस्त्रांचा स्रोत यांचा शोध घेण्यावर भर देण्यात येत आहे.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.