window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

पुण्यश्लोक संस्थेचे खाते अखेर उघडले; विधान परिषदेतील लक्षवेधी आणि सभापती राम शिंदे यांच्या हस्तक्षेपाने दोन वर्षांच्या प्रलंबनाला पूर्णविराम मुख्यप्रर्वतक वर्षाराणी पांडूरंग उबाळे



जामखेड :3 जानेवारी 2025

नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नामुळे जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चोंडीचे खाते अखेर उघडण्यात आले. या निर्णयामुळे संस्थेची नोंदणी प्रक्रिया गती घेईल आणि शेतकऱ्यांना विविध कर्जयोजनांचा लाभ मिळणार आहे.संस्थेचा प्रस्ताव १७ एप्रिल २०१७ रोजी साहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जामखेड यांच्याकडे दाखल झाला. सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांनी १९ मार्च २०२४ रोजी मंजुरी दिली आणि १५ एप्रिल २०२४ रोजी खाते उघडण्याची याचिका सादर करण्यात आली. मात्र, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १० जून २०२४ रोजी २४ फेब्रुवारी २०२२ च्या ठराव क्रमांक १५५ नुसार खाते उघडता येणार नाही, असे कळवले. विभागीय साहाय्यक निबंधक, नाशिक यांनी बँकेला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, तरीही बँकेच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षे प्रलंबित राहिले.


मुख्यप्रवर्तक वर्षाराणी पांडुरंग उबाळे यांनी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका (२९५९/२०२५) दाखल केली असता प्रकरण न्यायप्रलंबित झाले. दरम्यान, जामखेडचे भूमिपुत्र आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रवीण दरेकर व श्रीकांत भारती यांनी लक्षवेधी मांडली. सभापती राम शिंदे यांच्या आदेशानुसार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ खाते उघडण्याचे आणि कर्जवाटपाचे निर्देश दिले.


या निर्णयामुळे २ जानेवारी २०२६ रोजी संस्थेचे खाते उघडले गेले. बँकेची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपत असल्याने जामखेड तालुक्यातील एका मतदारसंघाची भर पडेल. प्रलंबित संस्थांना दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांना पंजाबराव कृषी पंथ पुरवठा योजना, शून्य टक्के व्याजदर कर्ज आणि कर्जमाफी योजनांचा लाभ होणार आहे. मुख्यप्रवर्तक वर्षाराणी पांडुरंग उबाळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.