पेट्रोलिंगमध्ये ट्रॅजेडी! चिंचाळा पोलिसाचा जागीच मृत्यू
- Police warrant
- 2 days ago
- 1 min read

कर्जत प्रतिनिधी/19 डिसेंबर2025
कर्जत तालुक्यातील राशीन येथे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना भरधाव अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी आणि अहिल्यानगर पोलीस दलातील अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे (२९) यांचा जागीच मृत्यू झाला.कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत राशीन पोलीस चौकीत कार्यरत असलेले सुदाम पोकळे हे सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत होते. अचानक आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना जबर धडक दिली. भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.त्यांच्या चिंचाळा (ता. आष्टी) गावातही शोकाची लाट उसळली. आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा मोठा परिवार पोरका झाला आहे. पुढील तपास सुरू असून, वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.











Comments