प्रबोधन समितीचा यशस्वी चर्चासत्र व रोजगार मेळावा
- Police warrant
- Feb 14
- 1 min read

आहिल्यानगर प्रतिनिधी/14फेब्रुवारी2026
दिनांक 13/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर येथे शासकीय योजनांचे वाटप. मार्गदर्शीका सन्मा डॉ सौ सुनिताताई मोडक..यांच्या मार्गदर्शनाखाली
भारत सरकार प्रणित गाव तिथे रोजगार, लोक अदालत, शासकीय योजना, लघुउद्योग, शैक्षणिक सहकार खातं, योजना, शासकीय निधी, उदरनिर्वाह स्वयंरोजगार शासकीय योजना, या सर्व विषयांवरती, सक्षम स्त्री सक्षम कुटुंब सक्षम समाज, धर्तीवर हे सर्व प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे यासाठी, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांना या सर्व योजनांची माहिती देण्यात आली .
राज्याची नवीन कार्यकारिणी निवड पुढीलप्रमाणे
सौ प्रियंका बेरड राज्य संपर्कप्रमुख,पदी व सौ अश्विनी झरेकर यांची महिला रोजगार राज्य संपर्कप्रमुखपदी तर, सौ शुभांगी देशमुख यांची सांस्कृतिक राज्य अध्यक्ष, प्रबोधन समिती पदी निवड जाहीर करण्यात आली..
अहिल्यानगर जिल्ह्यातील 20 तालुक्यांवरती प्रबोधन समिती उद्योजक मंच कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
सन्मा डॉ सौ सुनिताताई मोडक, राज्याध्यक्ष
नासिक विभागीय अध्यक्ष पंकज जैन, उपाध्यक्ष संतोष शिरसागर, उद्योजक मंच अध्यक्ष सौ मनीषा आहीराव, ग्रामपंचायत सदस्य' पत्रकार उमेश साठे यांचा सत्कार करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक शहर, तालुक्यातील महिला सदस्य यांच्या उपस्थितीत.. पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी नवनवीन पदाधिकाऱ्यांची निवड पुढील प्रमाणे
जिल्हा अध्यक्षपदी कल्याणी बेरड, तर जिल्हा उपाध्यक्षपदी आरती बेरड , जिल्हा कोषाध्यक्ष , जिल्हा संपर्क प्रमुख पूनम तांबे जिल्हा उपसंपर्क प्रमुखपदी ऐश्वर्या हजारे यांना पद देण्यात आली.
आधी राष्ट्र नंतर समिती शेवटी स्वतः.. या धर्तीवर महाराष्ट्रभर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं काम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.. अशी माहिती.. सौ प्रियंका बेरड राज्य संपर्कप्रमुख, यांनी सूत्रसंचालन केले तर
सौ.अश्विनी झरेकर महिला रोजगार राज्य संपर्कप्रमुख कार्यक्रमाचे अनुमोदन केले.व
सौ. शुभांगी देशमुख राज्य अध्यक्ष सांस्कृतिक विभाग यांनी महिला भगिनींचे आभार मानले. व ॲक्टिव्ह मराठीशी बोलताना माहिती दिली. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातून महिला भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.











Comments