प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थायी समितीवर मोठी मक्तेदारी!
- Police warrant
- Jan 20
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी, २० जानेवारी:
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १५ नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदावर मोठे यश मिळवले. प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत स्थायी समिती सभापतींच्या निवडी जाहीर झाल्या. सभापती सौ. प्रांजल अमित चिंतामणी व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ च्या कलम ६६(१)(अ) नुसार खालील निवडी झाल्या:
स्थायी समिती सभापती:नियोजन आणि विकास: पोपट दाजीराम राळेभात
महिला व बालकल्याण: सौ. जया संतोष गव्हाळे
सार्वजनिक बांधकाम: मोहन सिताराम पवार
स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य: सौ. वैशाली अर्जुन म्हेत्रे
पाणीपुरवठा व जलनिस्सारण: श्रीराम अजिनाथ डोके
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य: प्रविण विठ्ठल सानप
या निवडींमुळे जामखेडचा विकास वेगाने होईल, असा विश्वास आहे.











Comments