बनावट सोन्याचा डाव उधळला, राजस्थानी टोळी फसली! जामखेड पोलिसांचा खर्डा रोडवर धमाकेदार सापळा; ३ आरोपी जेरबंद
- Police warrant
- 4 days ago
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/16 डिसेंबर 2025
खर्डा रोडवरील रंगोली हॉटेल जवळ जामखेड पोलिसांनी आंतरराज्यीय फसवणूक टोळीला जेरबंद केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या भिनमाल तालुक्यातील आरोपींनी स्थानिक कापड व्यापारी गणेश महादेव खेत्रे (वय ३२, रा. महादेवगल्ली, जामखेड) यांना लक्ष्य करून बनावट सोने खरे असल्याचा भासवून फसवणुकीचा डाव आखला होता. पूर्वीपासून मोबाईलवर संपर्क साधत त्यांनी "नाशिकजवळ खोदकामात मिळालेले सोने" असा नाविन्यपूर्ण बहाणा सांगून ८ लाख रुपयांत माल विकण्याचे आमिष दाखवले.
गुप्त माहितीच्या आधारावर जामखेड पोलिसांनी खर्डा रोडवर पेट्रोलिंग वाढवली. आरोपींनी फिर्यादींकडून रोख ३,००० रुपये हिसकावले, तेव्हा पोलिसांनी तात्काळ धावत येऊन दोन आरोपींना रंगोली हॉटेलजवळ पकडले.
तिसरा आरोपी खर्डा बस स्टँडवरून ताब्यात घेतला गेला. आरोपींच्या ताब्यातून ३,००० रुपये रोख रक्कम आणि सुमारे १ किलो वजनाच्या बनावट सोन्याच्या माळा जप्त झाल्या.
आरोपी अशोक मिस्त्री (उत्तमकुमार मोकाराम बागरी, वय २४)प्रविणकुमार मोहनलाल बागरी (वय २५)मोहनलाल बालाजी बागरी (वय ५६) राज्यस्थान यांना ताब्यात घेण्यात आले असून
फिर्यादी गणेश खेत्रे यांच्या तक्रारीवर गुन्हा क्रमांक ६६४/२०२५ भाद्वी कलम ११९(१), ३१८(४), ३१८(२), ३(५) अंतर्गत दाखल झाला. पुढील तपास मा. सपोनि वर्षा जाधव करत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि वर्षा जाधव, पोसई संपत कन्हेरे, किशोर गावडे, पोहेकॉ प्रविण इंगळे, रविंद्र वाघ, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, शशिकांत म्हस्के तसेच मोबाईल सेलचे नितीन शिंदे, राहुल गुंडू यांचा समावेश होता.











Comments