बापरे ! खर्डा येथे जैन मंदिराचे कुलूप तोडून ८०,००० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरी!
- Police warrant
- Jan 30
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/30 जानेवारी2026
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात जैन श्वेतांबर मंदिरातील चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, मूर्तीवरील मौल्यवान दागिने नगुड्या चोरट्याने लंपास केले असल्याची घटना खर्डा येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरी दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० ते २९ जानेवारी रोजी सकाळी ७:०० या कालावधीत झाली असून सोन्याची मालपट्टी (२० ग्रॅम): ६०,००० रुपये,चांदीच्या बारा टिकल्या (१२ भार): ६,००० रुपयेचांदीचा मुकुट (१५ भार): ७,५०० रुपये,चांदीचा नारळ (५ भार): २,५०० रुपये,चांदीचा कंबरपट्टा (८ भार): ४,००० रुपये एकूण किंमत: ८०,००० रुपये

याबाबत कांतीलाल मोतीलाल खिवंसरा (वय ६०, रा. खर्डा, ता. जामखेड) यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्रमांक १२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय दंड संहिता कलम ३०५(डी), ३३१(४) प्रमाणे दाखल झाला असून, ३० जानेवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याने मंदिराचा लाकडी दरवाजाचा कुलूप तोडून आत शिरला आणि मूर्तीवरील सोने-चांदीचे दागिने लबाडीने चोरून नेले आहे सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि उज्वलसिंह राजपूत हे करीत आहेत.











Comments