बिबट्याचा वावर जायभायवाडीत! खर्डा हद्द सतर्क, ग्रामस्थ भयभीत!
- Police warrant
- Dec 28, 2025
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/28, डिसेंबर2025
जामखेड तालुक्यातील खर्डा गावाच्या हद्दीतील जायभायवाडी परिसरात बिबट्याचा वावर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागातील स्थानिक नागरिकांनी बिबट्याला जवळून पाहिले असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायभायवाडी परिसरातील बाळू बाबासाहेब मुंडे व तुकाराम नामदेव जायभाय या दोन स्थानिक नागरिकांनी आज रोजी रविवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता बिबट्याला जायभायवाडी परिसरात वावरताना पाहिले. यावेळी आम्ही तात्काळ गावकऱ्यांना सूचित केले," असून ही घटना घडल्यानंतर गावात तणाटणीत पसरली असून, रात्रीच्या वेळी लोक बाहेर पडण्यास घाबरत आहेत. व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या भागातील ग्रामस्थ म्हणाले शेतीकामासाठी जंगलाजवळ जावे लागते. बिबट्याचा वावर वारंवार होत असल्याने आम्हाला भीती वाटते. विशेषतः मुलां व महिलांसाठी धोका वाढला आहे." गावातील इतर नागरिकांनीही ही चिंता व्यक्त केली असून, वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











Comments