window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

बीड जिल्ह्यात दरोडेखोरांची टोळी; अंभोरा व खर्डा पोलीस स्टेशनकडून सावधानतेचा इशारा!



खर्डा, २४ फेब्रुवारी २०२६:

बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस स्टेशनने परिसरातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. भागात एक अट्टल दरोडेखोरांची टोळी सक्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. या टोळीकडे काळ्या रंगाची युनिकॉर्न गाडी, काळ्या रंगाची शाईन गाडी आणि ग्रे रंगाची बलेनो गाडी असल्याची माहिती आहे. या सर्व गाड्या बिगर नंबर प्लेटच्या आहेत.

अंभोरा पोलीस स्टेशनकडून जारी आवाहनात म्हटले आहे की, नागरिकांनी सावधानता बाळगावी. बाहेरून आलेल्या संशयास्पद व्यक्ती किंवा वर नमूद गाड्या दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा किंवा १०० क्रमांकावर कॉल करावा.


तसेच, खर्डा पोलीस स्टेशनकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खर्डा आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून शंभर क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे, रात्री एकटे फिरू नये आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाची तपास सुरू असून, टोळी लवकरच पकडली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.