बेकिंग न्यूज: विनापरवाना फ्लेक्स लावून नायगाव येथील श्रीनाथ यात्रेत वाद; ३८ जणांवर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल!
- Police warrant
- Feb 20
- 2 min read

खर्डा प्रतिनिधी/20फेब्रुवारी2026
जामखेड तालुक्यातील नायगाव येथे महाशिवरात्रि व श्रीनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या (१७ फेब्रुवारी २०२६) निमित्ताने बीएसएनएल चौकासमोर "महाशिवरात्रि व श्रीनाथ महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे स्वागत" असा फ्लेक्स लावण्यात आला. यावर ३८ जणांचे फोटो व नावे (मिथुन साहेबराव ढावरे, अमोल साहेबराव ढावरे, लखन बबन मिसाळ, समाधान लक्ष्मण साठे, आदेश दशरथ खवळे इ.) छापील होते. हा फ्लेक्स विनापरवाना बेकायदेशीर लावल्याने फोटोवरील व्यक्तींमधून वाद उफाळला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष मुरलीधर उगले (पोलीस पाटील, नायगाव) यांच्या तक्रारीवर खर्डा पोलीस स्टेशनने गुन्हा क्र. २१/२०२६ दाखल केला. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम २२३ (सार्वजनिक शांतता भंग), ३(५) व महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५ कलम ३ अंतर्गत नोंद.
संपूर्ण आरोपींची यादी (३८ जण, सर्व रा. नायगाव/सोनेगाव ता. जामखेड):
1)मिथुन साहेबराव ढावरे, 2)अमोल साहेबराव ढावरे दोघे रा.नायगाव ता.जामखेड, 3)लखन बबन मिसाळ रा.सोनेगाव ता.जामखेड, 4)समाधान लक्ष्मण साठे, 5)आदेश दशरथ खवळे, 6)बाळु साहेबराव ढावरे, 7)धनंजय रामा खवळे, 8)भाऊसाहेब साहेबराव ढावरे, 9)सोपान दशरथ खवळे, 10)कुणाल दत्तात्रय चांदणे, 11)ओमकार भरत खवळे, 12)निखिल संतोष खवळे, 13)सुधीर मधुकर गायकवाड, 14)विकास अशोक खवळे, 15)सागर नामदेव साठे, 16)शरद बापु खवळे, 17)जिवन दादा खवळे, 18)करण संजय खवळे, 19)सुरेश हनुमान खवळे, 20)विशाल अनासराव खवळे, 21)सागर रावसाहेब खवळे, 22)आकाश हरी खवळे, 23)सुरज संतोष ससाणे, 24)अभिषेक लक्ष्मण साठे, 25)विजय भाऊसाहेब खवळे, 26)आकाश बजरंग खवळे, 27)वैभव ईश्वर भंडारे, 28)अभिमान अनासराव खवळे, 29)अजय भाऊसाहेब खवळे, 30)सनी बाबु खवळे, 31)सागर शहाजी खवळे, 32)संकेत भरत खवळे, 33)बाबु बजरंग खवळे, 34)बबलु राजु खवळे, 35)राहुल बाळु खवळे, 36)श्रीमंत दादाराव खवळे, 37)केशव गणेश पुरी, 38)पांडुरंग मलप्पा काळे
सदरची कारवाई पो.अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर एसपी वैभव कलुबर्गे, उपविभागीय पीओ प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पो.स्टे प्रभारी सहाय्यक पीआय उज्वलसिंह राजपूत यांनी कारवाई केली. पोलीस अंमलदार दशरथ नागरगोजे, संदीप धामणे, प्रविण थोरात, शशी म्हस्के, धनराज बिराजदार यांनी केली आहे. पुढील तपास पो.हवा. संदीप धामणे करत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत म्हणाले, "नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय फ्लेक्स लावू नये. यात्रा-उत्सवात विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई होईल.











Comments