बोकड विकतो' म्हणून दागिने लंपासले; मुख्य गुंड जाक्या काळे गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ गुन्ह्यांचा इतिहास!
- Police warrant
- Feb 4
- 1 min read

श्रीगोंदा दि 4 फेब्रुवारी : 2026
श्रीगोंदा तालुक्यातील स्टेशन रोड, दळवी वस्ती येथील गोदाबाई बापुराव दळवी या महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किंमतीचे २ तोळे सोन्याचे डोरले व मंगलसूत्र हिसकावून चोरून नेले होते. स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगार जाक्या काळेला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार ओंकार काळे असल्याची कबुली मिळाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता गोदाबाई दळवी (रा. स्टेशन रोड, दळवी वस्ती, ता. श्रीगोंदा) शेतात शेळ्या चारत असताना दोन अनोळखी इसमांनी "बोकड विकायचा आहे" असे सांगून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळून गेले. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ११०/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०९(४), ३(५)) दाखल झाला.
पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने (गणेश लोंढे, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे) सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणे कामे सूचनावर मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले
तसेच व्यवसायिक कौशल्य व गुप्त माहितीच्या आधाराने आरोपीचा शोध घेतला. आरोपी जाक्या बगदास काळे (वय ४२, रा. चोराचीवाडी, ता. श्रीगोंदा) ताब्यात घेतला. त्याने साथीदार ओंकार शक्ती काळे (रा. साळनदेवी रोड, रडेवाडी) सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास:
जाक्या काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये ४ गुन्हे दाखल आहेत :४१२/२०१९ : कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६६०६/२०१९ : कलम ३२४, ३३६, १४३८६६/२०२१ : कलम ३२४, ३२३, ५०४८६३/२०२२ : कलम ३७९आरोपीला श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलिस अंमलदार यांनी केली आहे.











Comments