भयंकर सडक अपघात! जामखेड रोडवर वाहनाच्या धडकेने पुलावरून दुचाकी खाली कोसळली ; बीडच्या दोन तरुणांचा मृत्यू
- Police warrant
- Jan 22
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/22 जानेवारी2026
जामखेड-श्रीगोंदा रोडवरील मिरजगावजवळील पुलावर दि. १८ जानेवारी रोजी रात्री झालेल्या अपघातात बीड जिल्ह्यातील आष्टी तहसीलमधील वानवेवाडी (मतावली) येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली असून श्रीकांत नानासाहेब खांबकर वय (२०) आणि महेश अप्पासाहेब खांबकर वय(२२) हे बारामतीतील कृषी प्रदर्शनात आधुनिक शेती पद्धती व केळी लागवडीची माहिती घेण्यासाठी गेले होते.
परतीच्या वाटेवर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक देऊन पळून गेल्याने दुचाकी पुलावरून खाली कोसळली. त्यात श्रीकांतचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी महेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, धडक देणाऱ्या वाहनाचा शोध सुरू केला आहे.











Comments