top of page

भूम हादरलं! अपंग अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा सामूहिक अत्याचार – आरोपी जामखेड व अहिल्यानगरचे असल्याचे उघड

  • Writer: DIGITAL FLY
    DIGITAL FLY
  • 2 days ago
  • 1 min read

ree

भूम प्रतिनिधी/22ऑक्टोबर

धक्कादायक! धाराशिवच्या भूममध्ये अपंग अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारधाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अपंग अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली असून, इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील या मुलीच्या कुटुंबाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, कुटुंब झोपले असताना आरोपींनी दार बाहेरून बंद करून घरावर दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी घरात घुसून मुलीचे अपहरण केले आणि शेजारील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान दोन महिलांनी आरोपींना मुलीला उचलून नेताना पाहिल्याचे सांगितले आहे. काही वेळानंतर मुलगी शेतात अर्धवट कपड्यांमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली.शुद्धीवर आल्यानंतर मुलीने आपबीती कुटुंबियांना सांगितली. त्यांनी तत्काळ ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. भूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.या प्रकरणी लाल्या गोवर्धन काळे, अमित गोवर्धन काळे, बापू लिंग्या काळे, लंग्या साहेब्या काळे आणि अशोक बाळू पवार हे आरोपी जामखेड व अहिल्यानगर परिसरातील आहेत.

या संशयितांवर घरफोडी, धमकी, शारीरिक हल्ला, लैंगिक अत्याचार, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) तसेच अपंग व्यक्ती अधिकार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपींचा शोध भूम पोलिसांनी सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत तवर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.चालू आहे.

 
 
 

Comments


bottom of page