मॉर्निंग वॉकला गेल्या अन् पिकअपने संपवले प्राण; महिलेचा जामखेडमध्ये अपघाती मृत्यू, चालक फरार
- Police warrant
- Jan 2
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/2 जानेवारी2025
जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथे पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना पिकअपने मागून जोरदार धडक दिली. यात किरण गांगर्डे यांच्या आई विमल महादेव गांगर्डे (५४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली. चालक वाहनासह फरार झाला असला तरी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने वाहन जप्त केले.फिर्यादी किरण महादेव गांगर्डे (३४) यांच्या म्हणण्यानुसार, १ जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजता
त्यांची आई विमल गांगर्डे व मैत्रिणी जामखेड-जांबवाडी रस्त्याने नवीन महादेव मंदिराजवळ नदीकाठच्या रस्त्याने चालत होत्या. तेवढ्यात वेगाने आलेल्या पिकअपने (एमएच १६ डीपी ३५३६) त्यांना धडक दिली. जखमींना स्थानिकांनी तात्काळ दवाखान्यात नेले, पण विमल यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पिकअप ताब्यात घेतले. चालक अमोल अशोक डोके (रा. भुतवडा, जामखेड) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, तो अद्याप फरार आहे. पोलिस हवालदार शिवाजी कदम अधिक तपास करीत आहेत.











Comments