window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



अहिल्यानगर, 27 जानेवारी : 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष मोहीम छेडली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत मिरजगांव ता. कर्जत येथे संग्राम सुनिल जगताप (२३ वर्षे, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे)ला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३५,००० रुपयांची किंमत असलेली १ गावठी पिस्टल व ३,००० रुपयांची ३ जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्या.


एकूण मुद्देमालाची किंमत ३८,००० रुपये आहे. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती गोळा करून कारवाई करण्याचे आदेश दिले. या सूचनांनुसार पी.आय. कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथक तयार करण्यात आले.


यात उपनि. समीर अभंग, पो.अं. ऋदय घोडके, भिमराज खर्से, शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, महादेव भांड यांचा समावेश होता. एसपींनी पथकाला मार्गदर्शन करून रवाना केले.


दि.२६ जानेवारी रोजी हे पथक मिरजगांव पोलीस ठाणे हद्दीत माहिती संकलन करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मिरजगांव ता. कर्जत शिवारातील क्रांतीसूर्य महात्मा फुले ब्रिजखाली एक इसम विनापरवाना गावठी कट्टा बाळगून थांबला आहे. पथकाने तात्काळ मिरजगांव पोलीस स्टेशनचे सपोनि. विजय झंजाड, पो.अं. सुनिल खैरे, समीर सय्यद, अशोक रक्ताटे यांना मदतीसाठी बोलावले. ठिकाणी धावत गेल्यावर ब्रिजखाली संशयित दिसला. त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता, त्याने संग्राम सुनिल जगताप असल्याचे सांगितले.


संग्रामच्या झडतीत गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतूस सापडले. पो.अं. भाऊसाहेब राजु काळे (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या फिर्यादीवरून मिरजगांव पोलीस ठाण्यात गु.र. ३०/२०२६ आर्म्स ऍक्ट कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास मिरजगांव पोलीस करीत आहे.


ही कारवाई एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व मिरजगांव पो.स्टे.च्या वरील अधिकाऱ्यांनी यशस्वी केली.

अशा मोहिमांमुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठे कमी होण्यास मदत होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.