यशस्वी कारकीर्दीला नवे सोने! जामखेड नगरसेविका सौ. जयाताई संतोष गव्हाळेंची महिला-बालकल्याण सभापतीपदी निवड; तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव
- Police warrant
- Jan 21
- 1 min read

जामखेड: प्रतिनधी/22 जानेवारी2026
जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयानंतर प्रभाग 12 मधील नगरसेविका सौ. जयाताई संतोष गव्हाळे यांची नगरपरिषदेच्या सभापती महिला व बालकल्याण समितीपदी निवड झाली. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नगरसेविका जयाताईंचे पती संतोष गव्हाळे हे भाजपा युवा मोर्चा जामखेड शहर अध्यक्ष असून, त्यांचे सामाजिक कार्य केवळ वॉर्डपुरते मर्यादित नसून संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना तिकीट मिळाले आणि भरगट मतांनी निवडून आल्या.
आता लोकप्रिय नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयाताईंना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या समितीच्या सभापतीपदावर निवड केली आहे.या निवडीमुळे जामखेड तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रभाग 12 च्या नागरिकांचा विश्वास आणि सभापती राम शिंदे यांची निवड सार्थक ठरवत शहराचे विकासकामे जोमदारपणे पुढे नेत असल्याचे जयाताई गव्हाळे यांनी सांगितले.











Comments