window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

युवा नेते सागर टकले यांच्या मातोश्री आशाताई टकले यांच्या प्रचारात गर्दीचा महासागर! प्रचाराला जनसमर्थनाची लहर


जामखेड प्रतिनिधी/ 28 डिसेंबर 2025

जामखेड नगरपरिषद प्रभाग 11 मध्ये युवक नेते सागर टकले यांच्या सामाजिक कार्याला गावातील महिला, युवक आणि समाजसेवकांकडून प्रचंड दाद मिळत आहे. भाजपाचे युवक मोर्चा तालुकाउपाध्यक्ष असलेल्या सागर टकले यांनी त्यांच्या सामाजिक कामामुळे नागरिकांच्या मनावर विशेष प्रभाव टाकला आहे.सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीतील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन सुरू झालेल्या प्रचार मोहिमेत प्रभागातील तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. सागर टकले यांनी देवी दर्शनातून ते दिवाळी फराळ वाटप आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत अनेक उपक्रम राबवले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे महिला आणि युवकांचे प्रश्न सोडवण्याचा मार्गही सापडला आहे.


याच कार्यामुळेच मातोश्री सौ. आशाताई बापू टकले यांना भाजपाकडून अधिकृत उमेदवारी प्रदान करण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी आशाताई टकले यांना प्रचंड जनसमर्थन मिळत असून, त्यामागे सागर टकले यांच्या नेतृत्वाखाली चाललेले सामाजिक काम आणि जनतेशी घनिष्ठ संबंध मुख्य कारण ठरले आहेत.सभापती राम शिंदे यांनीही सागर टकले यांच्या प्रचारसभेत येणाऱ्या गर्दीचा आणि त्यांचं सामाजिक कामाचं कौतुक केलं आहे. येत्या 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे. महिला आणि युवकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे प्रचाराला विशेष गती प्राप्त झाली असून, सागर टकले यांना जनतेकडून मोठा पाठिंबा मिळतोय हे स्पष्ट झाले आहे.राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सागर टकले यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या प्रचार मोहिमेचा यशस्वी ठरल्यास प्रभाग 11 मध्ये सामाजिक विकास, रोजगार निर्मिती, आणि जनतेच्या समस्या सोडवण्याकडे केंद्रित धोरणे राबवली जातील, ज्यामुळे आशाताई टकले यांची निवड निश्चितच सशक्त होईल.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.