युवा पञकार रिजवान बागवान "आदर्श पञकार" पुरस्काराने सन्मानित..
- Police warrant
- Feb 14
- 1 min read

14 फेब्रुवारी2026
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा (शिवपट्टण) नगरीतील भूमिपुञ तसेच ग्रामीण पञकारितेतील एक दमदार आवाज म्हणून परिचित असलेले युवा पञकार श्री.रिजवान मौलाभाई बागवान यांना श्रावणी आधार फाऊंडेशन (पुणे) या संस्थेचे वतीने शिक्रापूर येथे 2026 चा "आदर्श पञकार पुरस्कार" प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करून सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या 10 वर्षापासुन श्री.रिजवान मौलाभाई बागवान यांनी ग्रामीण प्रश्न,स्थानिक समस्या,गावागावातील तळागळातील नागरिकांचे विविध प्रश्न नेमकेपणाने पुढे आणून अनेक वेळा प्रशासनाची दखल घडवून आणण्याचे प्रामाणिक कार्य त्यांनी केले आहे.तसेच पञकारिता क्षेञात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमाता बिग्रेडच्या संस्थापिका सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या सौ.मोनिकाताई हरगुडे,सिमाई फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ.सिमाताई पवार,भूमाता बिग्रेडच्या शिरूर तालुकाध्यक्षा सौ.मंगलताई सासवडे,डॉ.संध्याताई कारंडे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.स्नेहलताई हांडे,बौध्दाचार्य मुकेश गायकवाड,आंबेडकरवादी जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत कांबळे,लावणी सम्राट उमेशराजे मुळशीकर,समाजसेविका आम्रपाली मोहिते,समाजसेविका उत्कर्षाताई परदेशी,समाजसेविका सौ.श्रध्दाताई जाधव,पञकार शेरखान शेख,विकास दरेकर,मोतीराम निकुंभ,युवराज झेंडे,सनि सकट,विष्णु इंगळे आदि पदाधिकारी व शिव,फुले,शाहू,आंबेडकर,साठे चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन श्रावणी आधार फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वाढवे,समाजसेविका रेखाताई आल्हाट यांनी केले होते.











Comments