window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

राजकीय उद्देश न ठेवता मैत्री ग्रुप संस्थापक सागर गवसने यांचा अनोखा आदर्श! आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांसाठी तीर्थ दर्शन; स्वामी समर्थ प्रतिमा भेट


खर्डा प्रतिनिधी/30 डिसेंबर2025

तीन अपत्य असल्यामुळे निवडणूक न लढवता येत नाही हे माहीत असताना कोणताही राजकीय उद्देश डोळ्यासमोर न ठेवता मैत्री ग्रुप संस्थापक अध्यक्ष सागर गवसने (मराठा )यांचा अनोखा आदर्श आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव उंडा येथील ग्रामस्थांना आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ तीर्थयात्रा दर्शन तसेच यात्रा पूर्ण केल्यानंतर सर्व ग्रामस्थांना सिताराम गड येथे श्री स्वामी समर्थ प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली तालुकाध्यक्ष विजयसिंह आण्णा गोलेकर व चत्रभुज बोलभट यांनी यावेळी भव्य स्वागत केले.

प्रत्येक भाविकाला श्री स्वामी समर्थांची प्रतिमा सप्रेम भेट.ग्रामस्थांनी सागर सुभाष गवसने व आमदार रोहित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. "सागर भाऊंच्या सेवेचे आम्ही कायम ऋणी राहू," असे ग्रामस्थांनी सांगितले.

खर्डा गावात मोठ्या पावसाने पूरग्रस्त झाल्यावर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा किट वाटप करून मदत.निवडणूक न लढवता गावकऱ्यांची सेवा.मैत्री ग्रुप मार्फत सतत विविध उपक्रम.या सेवेमुळे मैत्री ग्रुपचे संस्थापक सागर गवसने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. "निवडणूक नसली तरी सेवा चालूच राहील," असे त्यांचे ध्येय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयसिंह गोलेकर व चत्रभुज बोलभट यांचे नेतृत्व या उपक्रमाने सागर गवसने यांच्या निष्वार्थ सेवेचा जामखेड तालुक्यात नवा आदर्श स्थापित झाला. ग्रामस्थांनी त्यांना सततच्या सेवेसाठी पुन्हा आभार मानले.


प्रतिक्रिया

"तीन अपत्य असल्यामुळे निवडणूक लढवता येत नाही हे माहीत असतानाही, राजकीय उद्देश कोणताही डोळ्यासमोर न ठेवता मी सामाजिक सेवेला प्राधान्य देतो. आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडिलांच्या स्मरणार्थ पिंपळगाव उंडा ग्रामस्थांना तीर्थयात्रा दर्शन घडवले आणि सिताराम गड येथे श्री स्वामी समर्थ प्रतिमा भेट दिली."

सागर सुभाष गवसने, मैत्री ग्रुप संस्थापक अध्यक्ष





 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.