रोहित पवारांचा शोककाळातील संयम: दि.9 तारखेपर्यंत राजकारणावर गप्प, नंतर मोठा खुलासा
- Police warrant
- Feb 2
- 1 min read

जामखेड प्रतिनिधि/2 फेब्रुवारी 2026
रोहित पवार यांनी अजितदादांच्या तेराव्यापर्यंत राजकीय चर्चेला स्थगिती दिली आहे. तेरावा (दि.9 फेब्रुवारी) झाल्यानंतर सर्व राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार (अजितदादा) यांच्या निधनानंतर रोहित पवार यांनी शोककाळात संयम बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, "अजितदादांचं तेरावं होईपर्यंत म्हणजे दि.9 तारखेपर्यंत मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही. तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी राजकीय विषयावर भाष्य करेन आणि सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देईन." असे रोहित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांचे दि 28 जानेवारी 2026 ला विमान अपघातात निधन झाले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. रोहित पवार हे अजित दादा पवार यांचे पुतणे असून शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. तेरावा संपल्यानंतर ते त्यानंतर पक्ष एकीकरण, नेत्यांच्या भूमिका आणि इतर मुद्द्यांवर सविस्तर खुलासा करणार आहेत. नेमका काय खुलासा होणार याकडे कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.











Comments