window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

वसीम बिल्डर मित्र मंडळ व मोगलपुरा यंग ग्रुपतर्फे जामखेडमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक हाजी शहेबाज व माजी नगरसेवकांचा भव्य सत्कार


जामखेड प्रतिनिधी/1फेब्रुवारी2026

सर्वांच्या सहकार्याने मुकुंदनगरचा विकास करून चेहरामोहरा बदलू तसेच शहरात कायमस्वरूपी हिंदू मुस्लिम ऐक्य आबादित ठेवणार याच बरोबर सामाजिक कामाला प्राधान्य देणार असल्याचे मत अहिल्यानगर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक हाजी शहेबाज यांनी व्यक्त केले असून सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला . जामखेड येथे नवनवीन मित्र परिवार भेटले या मैत्रीतूनच विचाराची देवाण घेवाण होते . आज वसीम बिल्डर मित्र मंडळ व मोगलपुरा यंग ग्रुपने आमचा जो सन्मान केला त्यांचा मी आभारी आहे .


वसीम बिल्डर मित्र मंडळ व मोगलपुरा यंग ग्रुपच्या वतीने जामखेड येथे आहिल्यानगर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक हाजी शहेबाज , खालीद शेख, माजी नगरसेवक समद खान, मुजीब शेख, मोहसीन शेख , शाकीर शेख, यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार समारंभ वसीम बिल्डर मित्र मंडळ व मोगलपुरा यंग ग्रुपच्यावतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

यावेळी वसीम बिल्डर, उमर कुरेशी, सज्जाद पठाण , ॲड . नाजीम पठाण, विकी घायतडक, ताहेर खान, हानीफ कुरेशी, जाकीर काझी ,शाकीर खान, मोहसीन कुरेशी , वसीम सय्यद, जमीर शेख, अबरार सच्च , वसीम कुरेशी, गुलजार शेख, इम्रान शेख ,दानिश पठाण, , अरमान शेख, अलतमश शेख , उबेद शेख, तौफीक शेख , आबेद शेख, आदनान शेख , जिशान शेख, शहेबाज सय्यद , अशकान शेख, गालीब कुरेशी, कुरेशी, शकिल शेख, खिजर खान, अय्यास शेख, शकिल शेख, आवेज कुरेशी,सोहेल काझी, अय्यास शेख, समीर खान, मुख्तार सय्यद, इस्माईल सय्यद, परवेज खान, इमरान कुरेशी, नाजिम काझी, इस्माईल शेख, अर्शद शेख, झाहीर शेख, काझी यांच्या सह या कार्यक्रमाला शहरातील विविध वसीम बिल्डर मित्र मंडळ व मोगलपुरा यंग ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याप्रसंगी माजी नगरसेवक समद खान यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एकजुटीने काम केले तर नक्कीचं ते मोठे विकास काम होऊ शकते . सर्वांनी एकजुटीने राहून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या विचाराने नवनिर्वाचित नगरसेवक काम करतील अशा विश्वास व्यक्त केला . लवकरच जामखेड शहरात एम आय एम पक्षाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी व्यक्त केले.



तसेच जामखेड शहराच्या सामाजिक ऐक्यासाठी व जातीय सलोखा राखण्यासाठी वसीम बिल्डर मित्र मंडळ व मोगलपुरा यंग ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन माजी नगरसेवक समद खान यांनी व्यक्त केले .


 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.