शेंडीतील बेकायदेशीर स्क्रॅप धंद्यावर कारवाईची मागणी स्क्रॅपच्या नावाखाली चोरीच्या गाड्यांचा कत्तलखाना - अफसर शेख यांची पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
- Police warrant
- Jan 8
- 1 min read

अहिल्यानगर (प्रतिनिधी): 8 जानेवारी2026
शेंडी परिसरात स्क्रॅप दुकानांच्या नावाखाली विनापरवाना चोरीच्या आणि गुन्हेगारी वाहनांचा बेकायदेशीर कत्तलखाना चालवला जात असल्याचा गंभीर आरोप मानव विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांनी केला आहे. या अवैध धंद्यामुळे शासन, फायनान्स कंपन्या आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतेय, असे ते म्हणाले.या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की, शेंडीतील काही भंगार दुकाने ट्रक, चारचाकी, दुचाकींसह विविध वाहने स्क्रॅपच्या आडोशाला तोडत आहेत. यात अनेक फायनान्स कर्जावर घेतलेली वाहने मुद्दाम थकीत ठेवून बेकायदेशीररित्या विकली जातात. परिणामी, शासनाचा महसूल बुडतो आणि फायनान्स कंपन्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागते.हा अवैध व्यवसाय गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठबळ देत असून, दुकानदारांना कोणाचा 'आशीर्वाद' आहे का, असा सवालही परिषदेने उपस्थित केला. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, ही ठाम मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा अफसर शेख यांनी दिला आहे











Comments