window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

श्रीगोंद्यात भिमा नदीत संशयास्पद मृतदेह सापडला ; खुनाचा संशय



आहिल्यानगर प्रतिनिधी/8फेब्रुवारी2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत भिमा नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, खुनाचा संशय व्यक्त केला जातोय.


दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या आधी निमगांव खलु गावच्या शिवारातील भिमा नदीत, नगर-दौंड महामार्गाच्या पूर्वेस जुन्या दगडी पुलाजवळ हा मृतदेह सापडला. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिवराम गांगर्डे (वय ५७, यांच्या फिर्यादीवरून गु.रजि. क्र. १२८/२०२६ भा.न्या.स. कलम १०३(१), २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मयाताचे वर्णन;

मयत अज्ञात पुरुष (अंदाजे २५-३० वर्षे), उंची १६७ सेमी, सावळा रंग, गोल चेहरा, बसके नाक. उजव्या हाताच्या कांबेच्या मागील बाजूस त्रिशुल आणि "महादेव" (मराठी) टॅटू आहे.


मृतदेह पांढऱ्या गोण्यांच्या तळवटीत व चॉकलेटी साडीत गुंडाळलेला असून, डोळ्यांना काळ्या प्लॅस्टिक पाईपने गाठोडे बांधलेले होते. आरोपी अज्ञात असून, खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी नदीत फेकल्याचा संशय आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून सर्व सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस ठाणेप्रमुखांना जावक क्रमांकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. मयताचे नातेवाईक किंवा माहिती असणाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना कळवावे.


संपर्क क्रमांक

श्रीगोंदा पोलीस स्टेशन: ०२४८७-२२२३३३

पो.नि. किरण शिंदे: ८३२९००८३०२

पो.उपनि. मनोहर खिळदकर: ९८८१७३१७२१

पो.कॉ/सचिन वारे: ९६२३२६४०२३

नागरिकांनी माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा.



 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.