संविधान भारतीय नागरिकांचा आत्मा — सपोनि. उज्वलसिंह राजपूत
- Police warrant
- Nov 26, 2025
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/२६ नोव्हेंबर २०२५
ग्रामीण विकास केंद्र संचलित भटके विमुक्त संसाधन केंद्र, खर्डा यांच्या वतीने आज (दि. 26 नोव्हेंबर) संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाचा आत्मा आहे. संविधान दिन प्रत्येक गावात, खेड्यात आणि वस्तीत साजरा करण्यात यावा, असे प्रतिपादन खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उज्वलसिंह राजपूत यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावर डॉक्टर मनीषा राळेभात या उपस्थित होत्या.

त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलांनी आपल्या घरी संविधानाचे प्रतीक म्हणून संविधान लावले पाहिजे, म्हणजे मुलांना संविधानाची ओळख आणि समज निर्माण होईल.”कार्यक्रमात डॉक्टर विपिनचंद्र लाड यांनी ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता इंगळे यांनी केले, तर अध्यक्ष सूचना मंगल शिंगाणे यांनी मांडली. अनुमोदन उर्मिला कवडे यांनी दिले, आणि कार्यक्रमाची प्रस्तावना विशाल पवार यांनी सादर केली. संविधानाची प्रस्तावना वाचून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, तर आभार प्रदर्शन लखपतीबाई गोलेकर यांनी केले.या कार्यक्रमास रोहन पिंपळे, लक्ष्मी दराडे, भीमराव सूरवसे, राणी बोत्रे, आश्मा आतार, आयोध्या गोरे, सविता खरात, रेखा खटावकर, सलीम मदारी, सुल्ताना शिकलकर, शकीला आदी मान्यवर उपस्थित होते.











Comments