सभापती प्रा.राम शिंदे यांचे कट्टर समर्थक भाजपा नेते बाजीराव गोपाळघरे खर्डा गणातून पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात उतरणार! पंचायत समितीची लढत होणार चुरशीची
- Police warrant
- Oct 25
- 2 min read

जामखेड (प्रतिनिधी) – 23ऑक्टोबर2025
जामखेड तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग येत असताना, आगामी पंचायत समिती निवडणूक खर्डा गणात रंगणार असलेली लढत आता अधिकच चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपा नेते बाजीराव गोपाळघरे यांनी खर्डा या गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरायची तयारी दर्शवली आहे.
याबाबतची माहिती त्यांनी पोलीस वारंट न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.भाजपा नेते व सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या बाजीराव गोपाळघरे यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदाचा कार्यभार एक वर्ष आठ महिने 14 दिवस सांभाळला आहे. त्यांनी भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असा निर्धार व्यक्त केला होता. आज त्यांच्या कार्यशैलीकडे पाहता तो निर्धार हळूहळू वास्तवात उतरत असल्याचे दिसून येते.
बाजीराव गोपाळघरे हे जामखेड तालुक्यातील नागोबाच्यावाडीचे भूमिपुत्र असून, त्यांनी राजकीय क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून त्यांनी गेल्या वर्षभरात अनेक युवकांच्या रोजगार, शिक्षण व सामाजिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत अनेक तोडगे काढले आहेत.विकास आणि समाजकारणात सक्रिय सहभागत्यांच्या माध्यमातून खर्डा परिसरातील विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. यात नागोबाच्यावाडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीपासून काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरील उपाययोजनांसह ग्रामीण भागातील घरकुल वाटपात वंचित राहिलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेसाठी मार्गदर्शन करणे अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “गाव चलो” अभियानांतर्गत प्रत्येक कार्यकर्त्याला एका गावाची जबाबदारी देण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत बाजीराव गोपाळघरे यांना बांधखडक गावाची जबाबदारी सोपवण्यात आली. या कालावधीत त्यांनी बांधखडक येथे आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर जनजागृती राबवली.
आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वही, पेन, लेखन साहित्यांचे वाटप करून शैक्षणिक प्रोत्साहन दिले. त्यांनी परिसरातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रमही हाती घेतले. तसेच युवकांना संघटित करून विविध विकास उपक्रमांत त्यांचा सहभाग वाढवण्याचे काम सातत्याने केले.
आता त्याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर खर्डा गणात भाजपची संघटनात्मक चळवळ वेग घेत आहे. प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे बाजीराव गोपाळघरे हे या गणातून उमेदवारीसाठी पक्षात प्रमुख दावेदारी मांडणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक बनले आहेत.गोपाळघरे यांच्या कार्यपद्धतीमुळे स्थानिक पातळीवर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे खर्डा परिसरातील अनेक युवक राजकारणात सहभागी होत आहेत.आता या पार्श्वभूमीवर खर्डा गणातील पंचायत समिती निवडणुकीत भाजपा नेते बाजीराव गोपाळघरे यांची उमेदवारी जाहीर होईल का, आणि ती निवडणुकीच्या समीकरणांवर किती परिणाम घडवेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे....











Comments