top of page

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप

  • Writer: DIGITAL FLY
    DIGITAL FLY
  • 2 days ago
  • 1 min read

नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

ree

जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५

11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले यांच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वॉर्डमधील महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित फुलले असून, सर्वांनी सागर भाऊ टकले यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

पै.सागर भाऊ टकले हे सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू सहकारी असून, भाजपाकडून 11 नंबर वॉर्डमधून नगरपरिषद निवडणूक लढवण्याचे इच्छुक उमेदवार आहेत. समाजकारणात नेहमी सक्रिय राहणारे सागर भाऊ हे गरजूंसाठी हात पुढे करणारे आणि युवकांच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सातत्यपूर्ण समाजसेवेने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आत्मीयता निर्माण झाली आहे.

या दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ गव्हाळे, वॉर्डमधील अनेक युवक, महिलावर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पै. सागर भाऊ टकले यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि भविष्यात वॉर्डातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांमध्ये सागर भाऊ टकले यांच्याबद्दल चांगले मत असून, “नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा असावा” अशी चर्चा सध्या वॉर्डात रंगताना दिसत आहे.

त्यांच्या या सामाजिक उपक्रमाने दिवाळी साजरी करण्याचा आनंद आणि समाजसेवेचा संदेश एकाच वेळी दिला आहे.या उपक्रमामुळे वॉर्ड क्रमांक 11 मधील महिलांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळाला असून, सागर भाऊ टकले यांचे हे कार्य समाजाशी असलेले त्यांचे नाते अधिक दृढ करणारे ठरले आहे.

 
 
 

Comments


bottom of page