सर्वसामान्यांचे लढाऊ नेते अॅड. अरुण आबा जाधव यांचा दणकट विजय!
- Police warrant
- Dec 22, 2025
- 1 min read

जामखेड | प्रतिनिधी/२२ डिसेंबर२०२५
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने प्रभाग ६ मधून दणकट विजय मिळवला. अॅड. अरुण जाधव व संगीताताई भालेराव यांनी विरोधकांना धूळ चारली.अभ्यासू, लढाऊ आणि सर्वसामान्यांचे नेते अॅड. अरुण जाधव यांच्या विजयाने वंचित कार्यकर्ते व शहरवासीय आनंदित झाले आहेत. आमदार रोहित पवार व सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. प्रांजलताई अमित चितामणी विजयी झाल्या.
नगरसेवक म्हणून भाजपचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, शिवसेना १, राष्ट्रवादी काँग्रेसचे १ व वंचितचे अॅड. अरुण (आबा) जाधव व संगीताताई भालेराव यांचा समावेश आहे. या विजयामुळे वंचित-शोषितांच्या मुद्द्यांना नगरपरिषदेत प्रभावी पाठिंबा मिळाला असून, सामाजिक न्याय, पारदर्शकता व विकासाच्या धोरणांवर जनतेचा विश्वास दिसतो आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दोघांचे अभिनंदन होत आहे.











Comments