सर्वात मोठी बातमी! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू
- Police warrant
- Jan 28
- 1 min read

बारामती, २८ जानेवारी २०२६:
महाराष्ट्राच्या राजकारणाला आज भयानक धक्का! बारामतीजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे
विमानात अजित पवारांसह एकूण ६ जण दिल्लीहून बारामतीकडे प्रवास करत होते. लँडिंग करताना विमान अपघातग्रस्त झाले असता त्याचे तुकडे उडाले आणि भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अजित पवारांसह उर्वरित ३ जण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडले. डीजीसीएने ६ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली असून, विमानाचे मलबे चारही बाजूंना विखुरलेले दिसत आहेत.
अपघाताची बातमी कळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार व पार्थ पवार हे दिल्लीतील शरद पवारांच्या ६ जनपथवरील निवासस्थानाहून घाईघाईने बारामतीकडे रवाने झाले आहेत. घटनास्थळी प्रशासन, अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणा झपाट्याने दाखल झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून अपघाताची पूर्ण माहिती घेतली. राज्यात शोकाकुल वातावरण पसरले असून, पुढील तपास सुरू आहे.











Comments