सोशल मीडियावरील प्रेम महागात पडले! महिलेला भेटायला गेल्याने तरुणाला बेदम मारहाण
- Police warrant
- Dec 23, 2025
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/२२डिसेंबर२०२५
सोशल मीडियावर ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी गेला तरुणाला चांगलेच महागात पडले. करमाळा शहराच्या पश्चिमेला असलेल्या जामखेड तालुक्यातील गावातील महिलेच्या पतीसह तिघांनी प्लंबिंगचे काम करणाऱ्या या तरुणाला लाथा-बुक्के व रबरी पाइपने मारहाण केली. याबाबत करमाळा पोलिसात फिर्याद देण्यात आली असून, हवालदार दीपक घोरपडे तपास करत आहेत.
जामखेड तालुक्यातील या गावातील प्लंबिंग व्यवसाय करणाऱ्या तरुणाची सोशल मीडियावर या महिलेशी ओळख झाली. गेल्या महिनाभरापासून फोनवर बोलणे सुरू होते. २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महिलेच्या बोलावणीवर तो तिच्या घरासमोर थांबला असता, तिच्या पतीने "माझ्या पत्नीची छेड काढतोस का?" म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.त्यावेळी उपस्थित दोघांनीही रबरी पाइपने डोक्यात, तोंडावर व पाठीवर वार करून तरुणाला जखमी केले. महिलेच्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरील संबंधांच्या धोक्याबाबत जागृती होण्याची गरज आहे.











Comments