अहिल्यानगर गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई! मध्यप्रदेशातून स्कॉर्पिओ व हॅरिअर मिळून ५५ लाखांच्या गाड्या परत आणल्या ; दोन आरोपी अटकेत
- Police warrant
- Oct 25
- 2 min read
आहिल्यानगर प्रतिनिधी/१७सप्टेंबर२०२५
अहिल्यानगर शहरात अलीकडच्या काळात चारचाकी वाहनचोरीच्या घटनांत वाढ झाली असून, त्याचा तपास व गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष पथके तयार करून तपास गतीमान करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेने अत्यंत कुशलतेने सखोल तपास करून, मध्यप्रदेशातील मंदसौर परिसरात थेट जाऊन कारवाई केली आणि तब्बल ५५ लाख रुपये किंमतीची दोन लक्झरी गाड्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८६०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यात महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी चोरीला गेली होती, ज्याची अंदाजे किंमत २५ लाख रुपये आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७५०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ब) अंतर्गत तक्रार दाखल झाली होती. यात टाटा कंपनीची काळ्या रंगाची हॅरिअर गाडी चोरीला गेली होती, ज्याची किंमत जवळपास ३० लाख रुपये आहे.
या दोन्ही वाहनांची एकूण किंमत ५५ लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते.
गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. दीपक मेढे, पो.उ.नि. संदिप मुरकुटे यांच्यासह अंमलदारांचा एक मजबूत पथक तयार करण्यात आला. या पथकातील पोलीस हवालदार व कर्मचारी यांनी ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या काळात मध्यप्रदेश आणि जालना जिल्ह्यात शोधमोहीम राबवली.
गुन्हेगारांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे मंदसौर परिसरातील दुरुस्ती गॅरेज आणि क्रेनच्या सहाय्याने हलविण्यात आलेली वाहने यांचे ठिकाण निश्चित करण्यात आले.
या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी इतर साथीदारांचे नाव उघड केले.
ताब्यात घेतलेले आरोपी :
१)हरीष सुरेशजी कुमावत (वय-२५ वर्षे, रा. रामगड, जि. मंदसौर, मध्यप्रदेश)
२)प्रकाश अर्जुनराम जानी उर्फ बिश्नोई (रा. गुमानपुरा, डेचु, जोधपूर, राजस्थान)
फरार आरोपी :
3) शामलाल (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. मंदसौर, मध्यप्रदेश)
4) श्रवण लखाराम देवासी (रा. नोसर, जि. बाडमेर, राजस्थान)
5) खेताराम देवासी (रा. बैतु, जि. बाडमेर, राजस्थान)
संपूर्ण तपास व चौकशीतून शहरातून चोरी गेलेल्या दोन्ही गाड्या थेट हस्तगत करण्यात आल्या.
स्कॉर्पिओ, किंमत अंदाजे २५ लाख रुपये
टाटा हॅरिअर, किंमत अंदाजे ३० लाख रुपये
एकूण किंमत : ५५ लाख रुपये
जप्त केलेली दोन्ही वाहने तपासासाठी संबंधित पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत.
फरार आरोपींसाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
तपासकार्य अजूनही सुरू असून पुढील धागेदोरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
सदर संपूर्ण कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. मार्गदर्शन पोनि किरणकुमार कबाडी यांचे होते. या मोहिमेत पोउपनि/दीपक मेढे, पोउपनि/संदिप मुरकुटे, पोहेकॉ/गणेश धोत्रे, पोहेकॉ/शाहीद शेख, पोहेकॉ/गणेश लबडे, पोकॉ/विशाल तनपुरे, पोकॉ/आकाश काळे, पोकॉ/रोहीत येमुल, पोकॉ/योगेश कर्डील, पोहेकॉ/फुरकान शेख, पोकॉ/प्रशांत राठोड यांनी विशेष योगदान दिले.











Comments