जामखेडमध्ये तब्बल ७५.१२% मतदान, नगरपरिषदेवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला! उद्याच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष!
- Police warrant
- 12 minutes ago
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/20 डिसेंबर2025
जामखेड नगरपरिषदेतील एकूण नोंदणीकृत मतदारसंख्या ५३६२ आहे; त्यापैकी २७०५ पुरुष व २६५७ महिला मतदार नोंदवले गेले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत एकूण ४०२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लिंगनिहाय मतदानपुरुष मतदारांपैकी २१२१ जणांनी मतदान केले. महिला मतदारांपैकी १९०७ जणींनी मतदान करून चांगला प्रतिसाद दिला.
जामखेड नगरपरिषदेची एकूण मतदान टक्केवारी ७५.१२१२ नोंदवली गेली आहे. उच्च मतदानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल मतदारांमध्ये जागृती आणि उत्साह दिसून आला.
निकालाकडे सर्वांचे लक्ष;
उद्या दि. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून नगरपरिषदेवर कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. जामखेडमध्ये झालेल्या जास्त मतदानामुळे अनेक प्रबळ पॅनेल व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून निकाल नाट्यमय असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.











Comments