अहिल्यानगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई;२ गावठी पिस्टल आणि ८ काडतुसे जप्त; शस्त्रविक्रीचा डाव फसला
- Police warrant
- Oct 29
- 2 min read

अहिल्यानगर, दि. 27 ऑक्टोबर 2025
शनिशिंगणापुर परिसरात अवैध शस्त्रविक्री रोखण्यासाठी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाईअहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे व विक्री करणारे इसमांविरोधात निर्णायक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील गुन्हे प्रतिबंध आणि अवैध शस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/दिपक मेढे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांच्या सह पथकाची निर्मिती करण्यात आली. पथकास जिल्ह्यातील विविध भागात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पथक नेवासा परिसरात गुप्त माहिती गोळा करत असताना बातमीदारामार्फत कळाले की भारत सोपान कापसे (वय 27, रा. मराठी शाळेजवळ, कांगोणी, ता. नेवासा) हा व्यक्ती गावठी पिस्टल विक्रीसाठी आणलेला आहे. ही माहिती विश्वसनीय असल्याचे खात्री करून पथकाने तत्काळ त्या दिशेने हालचाल केली.कांगोणी गावात शोध घेत असताना नमूद व्यक्ती सापडला. त्यास ताब्यात घेत चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली की दोन गावठी पिस्टल आणि आठ जीवंत काडतुसे त्याने विक्रीसाठी आणली असून ती स्वतःच्या घरात ठेवली आहेत.
पथकाने तत्काळ पंचनामा करून त्याच्या घराची झडती घेतली असता 60,000 रुपयांच्या किंमतीच्या दोन गावठी पिस्टल आणि 4,000 रुपयांच्या आठ जिवंत काडतुसे असा एकूण 64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शस्त्रविक्रीसंबंधी कोणत्याही वैध परवान्याचे दस्तऐवज सादर न करता आल्याने त्यास अटक करण्यात आली.
या घटनेबाबत शनिशिंगणापुर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सोमनाथ आसमानराव झांबरे यांच्या फिर्यादीवरून आर्म्स अॅक्ट कलम 3/25 आणि 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिशिंगणापुर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नियोजनानुसार पार पडली. या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करण्यात येत आहे.अहिल्यानगर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला असून अशा प्रकारच्या आणखी कारवाया पुढील काळात करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.











Comments