अहिल्यानगरमध्ये लाठीचार्ज अफवांवर विश्वास ठेवू नका; शांतता राखा –एसडीपीओ टिपरसे यांचे आवाहन
- Police warrant
- Oct 25
- 1 min read

अहिल्यानगर प्रतिनिधी/२९ सप्टेंबर२०२५
आहिल्यानगरमध्ये आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, परिसरातील शांतता राखण्यासह सामाजिक सलोखा जपण्याची विनंती केली आहे. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या मजकुरावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇
सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा गैरसमजात नागरिकांनी अडकू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात असून, शांतता राखणे सर्वांच्या हिताचे आहे.
अहिल्यानगरमध्ये 'आई लव मोहम्मद' रंगोली प्रकरणामुळे तणाव निर्माण झाला. धार्मिक भावना दुखावणाऱ्या मजकूरावरून दोन गटांत संघर्ष झाला. प्रदर्शनासाठी आलेल्या मुस्लिम समाजाच्या काही सदस्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची अफवा पसरली, परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखण्यासाठी आवाहन केले आहे. पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे. परिसरात सुरक्षेची वाढ करण्यात आली असून, नागरिकांनी अफवा टाळून सामाजिक सलोखा आणि शांतता राखावी.
समाजात एखादी अफवा पसरू देऊ नका, शांततेतच समाजाची प्रगती आहे!











Comments